बर्मिंगहॅम: एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला टी-20 क्रिकेटच्या गट बी मध्ये इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात पार पडला. टप्प्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 26 धावांनी पराभव ( England womens beat SA by 26 runs ) केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 167 धावा केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला 168 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 बाद 141 धावाच करु शकला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ डावाची सुरुवात करण्यासाठी क्रीझवर आला.संघाने दहा धावांवर पहिली विकेट गमावली, फलंदाज डंकले 1 धावांवर बाद झाला. त्याचवेळी डी व्याट 27 धावा करून बाद झाली. संघासाठी, एलिस कॅप्सने 37 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली, ज्यात तिने एक षटकार आणि सात चौकार मारले. मात्र, एमी जोन्स ( Batter Amy Jones ) आणि के ब्रंट यांनी नाबाद खेळी खेळताना अनुक्रमे 36 आणि 38 धावा केल्या. इंग्लंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 167 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले. गोलंदाज एस. इस्माईलने दोन गडी बाद केले. त्याचवेळी एन म्लाबा आणि अनेके बॉश यांनी 1-1 विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 141 धावा केल्या. अनिके बॉश (32), तज्मीन ब्रिट्स (38) आणि क्लो ट्रायॉन 16 धावांवर बाद झाले. त्याचवेळी लॉरा वोल्वार्ड ( Batter Laura Volward ) 41 धावांवर नाबाद राहिली. गोलंदाज कॅथरीन ब्रंट, फ्रेया कॅम्प, कर्णधार नताली एस. सीव्हर आणि सोफी एक्लेस्टोनने 1-1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा - Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव हिसकावणार बाबर आझमचा मुकुट, काय आहे कारण, घ्या जाणून