ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : पाकिस्तानचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय; अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवाननं ठोकलं शतक - क्रिकेट विश्वचषक 2023

Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेलं ३४५ धावांचं लक्ष पाकिस्ताननं ४८.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीकनं ११३ आणि मोहम्मद रिझवाननं १३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून मधुशनकानं दोन बळी घेतले.

Pak Vs SL
Pak Vs SL
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 2:13 PM IST

Updated : Oct 10, 2023, 10:30 PM IST

हैदराबाद Cricket World Cup २०२३ : विश्वचषकाच्या ८ व्या सामन्यात आज श्रीलंकेसमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ५० षटकांत ३४४-९ धावा केल्या. श्रीलंकेकडून विकेटकीपर कुसल मेंडिसनं ७७ चेंडूत धुवांधार १२२ तर समरविक्रमानं ८९ चेंडूत १०८ धावा ठोकल्या. पाकिस्तानकडून हसन अलीनं ७१ धावा देत ४ बळी घेतले.

अब्दुल्ला शफीकचं शतक : धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला १० च्या स्कोरवर मधुशनकानं समरविक्रमाच्या हाती झेलबाद केलं. इमाम-उल-हक १२ धावा करून मधुशनकाच्याच गोलंदाजीत बाद झाला. एका टोकावर सलामीवीर अब्दुल्ला शफीकनं शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. तो १०३ चेंडूत ११३ धावा करून बाद झाला. त्यानं १० चौकार आणि ३ षटकार ठोकले.

पाकिस्तान विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल : आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलॅंडचा पराभव केला होता. तर श्रीलंकेला मात्र दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात पाकिस्तान आपली विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर श्रीलंका आपल्या विजयाचं खात उघडण्यासाठी संघर्ष करेल. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महेश तिक्ष्णा, मथीशा पाथिराना, दिलशान मधुशनका

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन) : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

दासून शनाका : आम्ही प्रथम फलंदाजी करू. शेवटच्या काही सामन्यांमध्ये उत्तरार्धात गोलंदाजांना थोडी मदत मिळाली. आमच्या संघात एक बदल आहे. कसून रजिताच्या जागी तिक्ष्णा आला. आम्ही खूप क्रिकेट खेळत आहोत आणि आशा आहे की, आज आम्ही चांगली कामगिरी करू.

बाबर आझम : विकेट खूप कोरडी दिसते. आमच्यासाठी पहिली दहा षटकं खूप महत्त्वाची आहेत. आमच्या आघाडीच्या फळीनं अद्याप सर्वोत्तम कामगिरी केली नाही. आमच्या संघात एक आहे. फखरच्या जागी अब्दुल्ला शफीक आला. श्रीलंकेविरुद्ध आमचा रेकॉर्ड चांगला आहे. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.

हेही वाचा-

  1. Cricket World Cup २०२३ : आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग ११ निवडणं भारतासाठी सोपं नाही, अश्विनला संधी मिळेल का?
  2. Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जिंकवून द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत
  3. Asian Games २०२३ : ...तर भारतही चीन, जपानप्रमाणे ढिगानं पदकं जिंकेल, मात्र...

Last Updated : Oct 10, 2023, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.