ETV Bharat / sports

CRICKET WC : रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेची इंग्लंडवर २० धावांनी मात - england vs shri lanka

अनुभवी लसिथ मलिंगाने ४ तर फिरकीपटू धनंजय डि-सिल्वाने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

CRICKET WC : रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेची इंग्लंडवर २० धावांनी मात
author img

By

Published : Jun 21, 2019, 11:53 PM IST

लीड्स - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडवर २० धावांनी धक्कादायक मात केली आहे. अनुभवी लसिथ मलिंगाने ४ तर फिरकीपटू धनंजय डि-सिल्वाने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे २१२ धावांवर यजमानांचा डाव आटोपला.

इंग्लंडची सलामीवीर जोडी फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. जॉनी बेअरस्टोला पहिल्याच षटकात मलिंगाने पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या रुटने डाव सावरत आपले अर्धशतक साजरे केले. रुटने ३ चौकारांसह ५७ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनदेखील २१ धावा करुन माघारी परतला. रुट बाद झाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ७ चौकैर आणि ४ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली खरी पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. अविष्का फर्नांडोने 49, कुसल मेंडिस 46 आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 85 धावा करत श्रीलंकेचा डाव सावरत इंग्लंडला २३३ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. तर, फिरकीपटू आदिल राशिदने 2 आणि क्रिस वोक्सने 1 गडी बाद केला.

Intro:Body:

sri lanka beat england by 20 runs in icc cricket world cup 2019

icc, cricket world cup 2019, england vs shri lanka, श्रीलंकेची इंग्लंडवर २० धावांनी मात

CRICKET WC : रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेची इंग्लंडवर २० धावांनी मात

लीड्स - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेची इंग्लंडवर २० धावांनी धक्कादायक मात केली आहे. अनुभवी लसिथ मलिंगाने ४ तर फिरकीपटू धनंजय डि-सिल्वाने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे २१२ धावांवर यजमानांचा डाव आटोपला.

इंग्लंडची सलामीवीर जोडी फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. जॉनी बेअरस्टोला पहिल्याच षटकात मलिंगाने पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या रुटने डाव सावरत आपले अर्धशतक साजरे केले. रुटने ३ चौकारांसह ५७ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनदेखील २१ धावा करुन माघारी परतला. रुट बाद झाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ७ चौकैर आणि ४ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली खरी पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.  

तत्पूर्वी नाणेफेक जिंकलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. अविष्का फर्नांडोने 49, कुसल मेंडिस 46 आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 85 धावा करत श्रीलंकेचा डाव सावरत इंग्लंडला २३३ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. तर, फिरकीपटू आदिल राशिदने 2 आणि क्रिस वोक्सने 1 गडी बाद केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.