लंडन - लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी मात केली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने आपले गुणतालिकेतले अव्वल स्थान कायम राखले. ऑस्ट्रेलियाच्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने १५७ धावांपर्यंतच मजल मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना मिशेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर जिंकला. या सामन्यात स्टार्कने निम्मा संघ एकट्याने बाद केलाच पण त्याचबरोबर एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
-
3️⃣ - Mitchell Starc now has more World Cup five-wicket hauls than any other player 👏 #CWC19 | #CmonAussie pic.twitter.com/m0rODHvb5Z
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">3️⃣ - Mitchell Starc now has more World Cup five-wicket hauls than any other player 👏 #CWC19 | #CmonAussie pic.twitter.com/m0rODHvb5Z
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 20193️⃣ - Mitchell Starc now has more World Cup five-wicket hauls than any other player 👏 #CWC19 | #CmonAussie pic.twitter.com/m0rODHvb5Z
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 2019
विश्वचषकात स्टार्कने आतापर्यंत तीन वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. असे करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी आत्तापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्याअगोदर स्टार्कने न्यूझीलंड विरुद्ध 6 तर विंडीज विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने दिलेले २४४ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरली. मात्र, त्यांची सुरूवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टिन गुप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली. मात्र, स्टार्कने विल्यमसनला बाद करून ही जोडी फोडली. विल्यमसनने ४० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली.