लंडन - लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे 'विराट' आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३१६ धावांवर सर्वबाद झाल्याने भारताने मोठा विजय मिळवला. भारतासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ तर युजवेंद्र चहलने २ विकेट घेतले.

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शिखर धवनचे ११७ धावा करत दमदार शतक झळकावले. तर रोहित शर्मा (५७) आणि कर्णधार विराट कोहलीने (८२) धावा करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकामध्ये ३५२ धावा फटकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्टोयनीसने २ तर कुल्टर-नाईल, स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नव्हते.
भारताच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सलामी दिली होती. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून विश्वकरंडकावर आपली दावेदारी सिद्ध केली होती. मात्र या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांचा विजयरथ रोखला.
खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघाची Playing XI
- भारत - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल.
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.