ETV Bharat / sports

ICC WC २०१९ : वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी धुव्वा; भारताचे उपांत्य फेरीकडे आणखी एक पाऊल

विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली आहे.

ICC WC २०१९ : भारत उपांत्य फेरीत; वेस्ट इंडिजचा उडवला १२५ धावांनी धुव्वा
author img

By

Published : Jun 27, 2019, 12:29 PM IST

Updated : Jun 27, 2019, 10:28 PM IST

मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली आहे. या सामन्याच्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवलेचे नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १२५ धावांनी जिंकला.

अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ४ बळी घेतलेल्या मोहम्मद शमी याही सामन्यात ४ बळी मिळवले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने एक एक बळी मिळवला.

भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ७ बाद २६८ धावांवर मजल मारली. यात विराट कोहली ( ७२) महेंद्रसिंह धोनी (५६), या दोघांची अर्धशतकी खेळी आणि लोकेश राहूल (४८), हार्दिक पांड्या (४६) यांच्या मदतीने विंडीजसमोर २६८ धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून केमर रोच ३, शेल्डन कॉट्रेल आणि जेसन होल्डर याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

भारताने या स्पर्धेत अजेय राहत उपांत्य फेरी गाठली आहे.

Intro:Body:

india will face west indies in icc cricket world cup

icc, cricket world cup, ind vs west indies, match 34

Cricket WC : बेभरवश्या वेस्ट इंडिजसमोर आज 'अपराजित' विराटसेनेचे आव्हान

मँचेस्टर- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे रसेलच्या जागी आता सुनील आंब्रीसचा संघात समावेश करण्यात आला आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला होता. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकात ८ बाद २९१ धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या २९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. मात्र, तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती.

तर दुसरीकडे तुलनेत नवख्या असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला २२४ धावांवर रोखल्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघ -

भारत - विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

विंडीज - जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, सुनील आंब्रीस, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन, ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेटमायर, शाय होप, ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, इव्हिन लुईस.

Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.