लंडन- आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना लंडनच्या प्रसिद्ध लॉर्डस मैदानावर दुपारी ३ वाजता खेळला जाणार आहे.
लंडनच्या लॉर्डस मैदानावरचा हा पहिला सामना असणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी 'करा अथवा मरा' सारखा आहे. कारण आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही संघांनी आत्तापर्यंत एक-एकच विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेने ६ सामन्यात केवळ ३ गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी राहिलेले चारही सामने जिंकणे आवश्यक आहे.
दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. गोलंदाज लूंगी एंगिडी याच्या घरवापसीमुळे दक्षिण अफ्रिकेला बळकटी मिळाली होती. मात्र, त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
असे असतील दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान- सरफराज अहमद (कर्णधार), फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम, हैरिस सोहेल, हसन अली, शाहदाब खान, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, शाहीन शाह अफरीदी, वहाब रियाज, मोहम्मद आमिर, शोएब मलिक, इमाद वसीम आणि आसिफ अली.
दक्षिण अफ्रिका - फाफ डु प्लेसी (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम, हाशिम अमला, जेपी डुमिनी, डेविड मिलर, कैगिसो रबाडा, ड्वेन पर्टोरियस, एंडिले फेलुकवायो, तबरेज शम्शी, इमरान ताहिर, लुंगी एनगिडी, क्रिस मौरिस, रासी वैन डर दुसेन आणि बी हेंड्रिक्स.