साऊदम्पटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. हा सामना साउथॅप्टनच्या रोज बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत होणार आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा या विश्वचषकातील हा पहिलाच सामना असणार आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत ५-१ असे हरवण्याची किमया भारतीय संघाने केली होती. सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असून त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सध्याचा आफ्रिका संघ भारतापेक्षा कमी ताकदवान वाटत असला तरीही, विश्वचषकाचा आणि एकदिवसीय सामन्याचा इतिहास बघता चित्र थोडे वेगळे पाहायला मिळते. व्हिडीओच्या माध्यामातून जाणून घेऊया हा इतिहास.