पॉटशेफस्ट्रूम - १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या युवा संघाने बलाढ्य भारतीय संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. बांगलादेशने प्रथम विश्व करंडक जिंकण्याचा पराक्रम केला. विजयानंतर आनंद साजरा करताना बांगलादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की केली. यावर भारतीय कर्णधार प्रियम गर्गने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियम गर्गने सांगितले की, 'पराभवानंतर आम्ही शांतच होतो. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. पण, त्यांच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह हावभावाने रिअॅक्शन दिली. त्यांनी तसे करायला नको होते.'
काय घडले अंतिम सामन्यानंतर -
सामना जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला.
-
Shameful end to a wonderful game of cricket. #U19CWCFinal pic.twitter.com/b9fQcmpqbJ
— Sameer Allana (@HitmanCricket) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shameful end to a wonderful game of cricket. #U19CWCFinal pic.twitter.com/b9fQcmpqbJ
— Sameer Allana (@HitmanCricket) February 9, 2020Shameful end to a wonderful game of cricket. #U19CWCFinal pic.twitter.com/b9fQcmpqbJ
— Sameer Allana (@HitmanCricket) February 9, 2020
दरम्यान या प्रकरणाची अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) ने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याबाबत तपास सुरू आहे.
बांगलादेशी कर्णधाराची काय होती प्रतिक्रिया -
बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने सामन्यानंतर माफी मागताना सांगितले की, जे घडले ते घडायला नको होतं. अंतिम सामन्यातील विजयानंतर आमच्या खेळाडूंच्या भावनांचा बांध फुटला आणि खेळाडूंकडून नकळत चूक झाली. तसे व्हायला नको होते. मी माझ्या संघाच्या वतीने माफी मागतो.'
दरम्यान, बांगलादेशने हा सामना डकवर्थ लुईस नियमाने ३ गडी राखून जिंकला. अकबर अली सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत ४०० धावा करताना यशस्वी जैस्वाल मालिकावीर ठरला.
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटला गालबोट, अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशचे खेळाडू भिडले
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडियासाठी माउंट माउनगुई लकी, जाणून घ्या रेकॉर्ड