कटक - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना बाराबती स्टेडियम कटक येथे खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आत्तापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना खिशात घातला आहे. त्यामुळे उद्या रंगणारा हा सामना चाहत्यांसाठी उत्सुकतेचा असणार आहे.
-
📸📸
— BCCI (@BCCI) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Snapshots from #TeamIndia's training session ahead of the 3rd and final ODI against West Indies.
Who will take the 🏆 home?#INDvWI pic.twitter.com/CCkPrpR5Gw
">📸📸
— BCCI (@BCCI) December 21, 2019
Snapshots from #TeamIndia's training session ahead of the 3rd and final ODI against West Indies.
Who will take the 🏆 home?#INDvWI pic.twitter.com/CCkPrpR5Gw📸📸
— BCCI (@BCCI) December 21, 2019
Snapshots from #TeamIndia's training session ahead of the 3rd and final ODI against West Indies.
Who will take the 🏆 home?#INDvWI pic.twitter.com/CCkPrpR5Gw
हेही वाचा - अंतिम वन-डेपूर्वी शिवम आणि होल्डर खेळताहेत टेबल टेनिस, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाने या सामन्यापूर्वी मैदानात कसून सराव केला. या सरावात क्षेत्ररणाकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात आले. या मालिकेत टीम इंडियाने क्षेत्ररणात गचाळ कामगिरी केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी महत्वाचे झेल सोडले. त्यामुळे या सर्व चुका सुधारण्याचा आणि सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात विंडीजने आठ विकेट्सने विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली. पण, त्यानंतरच्या विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत १०७ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरी साधली आहे.