मुंबई - भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज तथा मिस्टर आयपीएलच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने सोमवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुरेश-प्रियांका या कपलला २०१६ मध्ये मुलगी झाली होती आणि तिचे नाव गार्सिया असे ठेवण्यात आले. त्यानंतर आता २०२० मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. कोरोना विषाणूच्या गंभीर वातावरणात रैनासह त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरली.
-
Kutti Thala is here! Lots of #Yellove and #WhistlePodu to @_PriyankaCRaina and @ImRaina for the newest addition to the #superfamily. 🦁💛 pic.twitter.com/Uz2SYEKHGR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kutti Thala is here! Lots of #Yellove and #WhistlePodu to @_PriyankaCRaina and @ImRaina for the newest addition to the #superfamily. 🦁💛 pic.twitter.com/Uz2SYEKHGR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2020Kutti Thala is here! Lots of #Yellove and #WhistlePodu to @_PriyankaCRaina and @ImRaina for the newest addition to the #superfamily. 🦁💛 pic.twitter.com/Uz2SYEKHGR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2020
दरम्यान, सुरेश रैनाला गुडघ्याच्या दुखापतीने हैरान केलं होतं. यामुळे त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. तो टी-२० विश्वकरंडक खेळण्यासाठी इच्छूक असून आगामी आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्यात त्याचा निर्धार आहे. त्याने २०१८ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता.
कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. सुरुवातीला ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होईल, असे बीसीसीआयने सांगितलं. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल १५ एप्रिलापासून होईल, असे दिसत नाही.
हेही वाचा - कोरोनामुळे आमचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, 'या' देशानं केलं जाहीर
हेही वाचा - 'मोदीजी रविवारी ५ वाजता तुम्ही काय केले..? व्हिडिओ शेअर करा आम्हालाही पाहू द्या'