जयपूर - महिलांच्या आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने सुपरनोव्हासवर २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्स संघाने १४० धावा उभारल्या होत्या. ट्रेलब्रेझरकडून कर्णधार स्मृती मंधानाने शानादार ९० तर हर्लिन देओलने ३६ धावांची खेळी केली.
ट्रेलब्लेझर्सने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना सुपरनोव्हासचा संघ १३८ धावा करु शकल्याने अवघ्या २ धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सुपरनोव्हासकडून कर्णधर हरमनप्रीत कौरने सर्वाधिक नाबाद ४६ धावांची खेळी केली. तर चामरी अटापट्टूने २६, जेमिमा रोड्रिग्ज २४ आणि सोफी डिवाइनने ३२ धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.
या सामन्यात ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मंधानाने केलेल्या शानदार फलंदाजीसाठी तीला 'मॅच ऑफ द प्लेयर'चा पुरस्कार देण्यात आला.
आयपीएलच्या धर्तीवर ६ ते ११ मे या काळात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी 'वुमन्स टी २० चॅलेंज' ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अश्या ३ संघांचा समावेश करण्यात आलाय.