ETV Bharat / sports

गांगुलीची 'दरियादिली', गुरुंच्या उपचाराचा खर्च उचलणार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे पूर्व प्रशिक्षक अशोक मुस्तफी यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. गांगुलीला याची माहिती होताच त्याने, मुस्तफी यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वत: उचलण्याचा निर्णय घेतला.

sourav gangulys first coach hospitalized bcci president to take financial care
गांगुलीची 'दरियादिली', गुरुंच्या उपचाराचा खर्च उचलणार
author img

By

Published : Apr 9, 2020, 10:37 AM IST

कोलकाता - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे पूर्व प्रशिक्षक अशोक मुस्तफी यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. गांगुलीला याची माहिती होताच त्याने, मुस्तफी यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वत: उचलण्याचा निर्णय घेतला. गांगुलीच्या या 'दरियादिली'चे क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे.

अशोक मुस्तफी यांना बंगालचे रमाकांत आचरेकर असे म्हटले जाते. बंगाल क्रिकेटरसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे. मुस्तफी यांना वाढत्या वयोमानानुसार त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे शनिवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुस्तफी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती गांगुलीचा मित्र संजय दास याने त्याला दिली. तेव्हा गांगुलीने मुस्तफी यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. तसेच त्याने मुस्तफी यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वत: करणार असल्याचे दास याला सांगितले. दरम्यान, मुस्तफी आपल्या घरात एकटेच राहतात. कारण त्यांची मुलगी सद्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.

सौरव गांगुलीला जिगरबाज, जिद्दी आणि धाडसी क्रिकेटपटू म्हणून ओळखले आहे. गांगुली याने भारतीय क्रिकेट संघाला कर्णधार या नात्याने आत्मविश्वास मिळवून दिला आहे. २३ ऑक्टोबरला हाच कणखर माजी कर्णधार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. बीसीसीआय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये नवे बदल करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा - केरळातील गावानं केलं वॉर्नरचं अनुकरण, ५० तरूणांनी केलं मुंडण!

हेही वाचा - साऊदीला मिळाला न्यूझीलंडचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.