ETV Bharat / sports

Womens T20 Challenge Final : स्मृतीच्या ट्रेलब्लॅझर्स संघाने पटकावले जेतेपद; सुपरनोव्हाजची हुकली हॅट्ट्रिक

ट्रेलब्लेझर्स संघाने गतविजेत्या सुपरनोव्हाजचा अंतिम फेरीत १६ धावांनी पराभव करत महिला टी-२० क्रिकेट चॅलेंजर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

author img

By

Published : Nov 10, 2020, 2:55 PM IST

smriti mandhana lead trailblazers won womens t20 challenge beating supernovas 16 runs final
Womens T20 Challenge Final : स्मृतीच्या ट्रेलब्लॅझर्स संघाने पटकावले जेतेपद; सुपरनोव्हाजची हुकली हॅट्ट्रिक

शारजाह - ट्रेलब्लेझर्स संघाने गतविजेत्या सुपरनोव्हाजचा अंतिम फेरीत १६ धावांनी पराभव करत महिला टी-२० क्रिकेट चॅलेंजर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्मृती मंधानाच्या अर्धशतकासह गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे ट्रेलब्लेझर्सला विजय साकारता आला. ट्रेलब्लेझर्सचे हे पहिले विजेतेपद आहे.

ट्रेलब्लेझर्सने दिलेल्या विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य गाठताना सुपरनोव्हाज ७ बाद १०२ धावाच करू शकला. दीप्ती शर्मा आणि सलमा खातून या दोघीच्या फिरकीपटूपुढे सुपरनोव्हाजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी भरवशाची सलामीवीर चामरी अटापट्टू (६) फार काळ तग धरू शकली नाही. त्यामुळे सुपरनोव्हाजचे दडपण वाढले. हरमनप्रीत कौरला (३०) सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले नाहीत. त्यामुळे सुपरनोव्हाजचा पराभव झाला.

तत्पूर्वी, स्मृती मंधानाच्या अर्धशतकामुळे ट्रेलब्लेझर्सला २० षटकात ८ बाद ११८ धावा करता आल्या. राधा यादवने पाच विकेट घेत ट्रेलब्लेझर्सला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. मंधानाने ४९ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. त्याला तिची सलामीची सहकारी ड्रियांड्रा डॉटिनने (२०) साथ दिल्याने या दोघींनी ११ षटकांत ७१ धावांची सलामी दिली. डॉटिन बाद झाल्यावर राधाच्या फिरकीपुढे ट्रेलब्लेझर्सच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. राधाने चार षटकांत अवघ्या १६ धावा देत राधाने पाच बळी मिळवले.

हेही वाचा - INS vs AUS : वरुण चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; 'या' गोलंदाजांला टीम इंडियात स्थान

हेही वाचा - IND vs AUS : पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार, रजा मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.