मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम क्रीडा जगतावरही झाला आहे. याच्या भीतीने जगातील महत्वाच्या लीग स्पर्धा तसेच अनेक मालिकाही रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या टी-२० सुपर लीगवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. या सर्वांचे खापर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएख अख्तरने चीनवर फोडले आहे.
शोएबने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्याने, कोरोनाच्या उत्पत्तीला चीनला जबाबदार धरले आहे. मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघुळ का खाता? त्यांचे रक्त का पिता? त्यामुळे संपूर्ण जगात धोकादायक विषाणू पसरतो. मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे, त्यांनी संपूर्ण जगाला संकटात टाकले आहे. खरोखरच मला हे समजत नाही की, तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता? चिनी लोकांमुळे संपुर्ण जग संकटात आहे. याचा फटका पर्यटनासह अर्थव्यवस्थेला बसला आहे. असे शोएब म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मी चिनी लोकांच्या विरोधात नाही. तसेच मी चीनवर बहिष्कार घाला असे म्हणणार नाही. कारण मी चीनची संस्कृती समजू शकतो. पण त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे काही तरी कायदा असलाच पाहिजे. तुम्ही काहीही खाऊ शकत नाही, असेही शोएब म्हणाला.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील ५ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर १०० हून अधिक देशात याचा फैलाव झाला आहे.
हेही वाचा - शाहरुख म्हणतो, कोरोनाचा लवकरच 'दी एन्ड' अन् आयपीएलचा थरार सुरू
हेही वाचा - 'खंबीर राहा, योग्य काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ'