ETV Bharat / sports

रणजी ट्रॉफी : मुंबई-उत्तर प्रदेश लढत अनिर्णीत, सर्फराजचे त्रिशतक - सर्फराज खान त्रिशतक न्यूज

मुंबईकडून खेळताना सर्फराजने ३९१ चेंडूत नाबाद ३०१ धावा केल्या. यात त्याने ३० चौकार आणि ८ षटकार मारले. कर्णधार आदित्य तरे शतकापासून तीन तर, सिद्धेश लाड दोन धावांनी वंचित राहिला.

sarfaraz khan hits triple century against uttar pradesh in ranji trophy
रणजी ट्रॉफी : मुंबई-उत्तर प्रदेश लढत अनिर्णीत, सर्फराजचे त्रिशतक
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:25 PM IST

मुंबई - युवा फलंदाज सर्फराज खानच्या त्रिशतकाच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशविरूद्धचा सामना बरोबरीत सोडवला आहे. मुंबईकडून खेळताना सर्फराजने ३९१ चेंडूत नाबाद ३०१ धावा केल्या. यात त्याने ३० चौकार आणि ८ षटकार मारले. कर्णधार आदित्य तरे शतकापासून तीन तर, सिद्धेश लाड दोन धावांनी वंचित राहिला.

हेही वाचा - महिला कबड्डीपटूला केलेल्या मारहाणीप्रकरणी बंगाल वॉरियर्सचा प्रशिक्षक अटकेत!

उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ६२५ धावा रचल्यानंतर, मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. या दोघांनंतर भूपेन लालवानीने ४३ आणि हार्दिक जितेंद्रने ५२ धावा जोडल्या. त्यानंतर आलेल्या सिद्धेश लाड आणि सर्फराज खानने मुंबईसाठी किल्ला लढवला. सिद्धेश १० चौकार आणि एका षटकारासह ९८ धावांवर बाद झाला. मुंबई लवकर आटोपणार असे वाटत असताना आदित्य तरे आणि त्याच्यानंतर, शम्स मुलाणी संघासाठी धावून आले. तरेने १४ चौकारांसह ९७ धावा तर, मुलाणीने ५ चोकार आणि एका षटकारासह ६५ धावा केल्या. सर्फराजसोबत आकाश पारकर नाबाद राहिला. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले. या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले.

Intro:Body:

रणजी ट्रॉफी : मुंबई-उत्तर प्रदेश लढत अनिर्णीत, सर्फराजचे त्रिशतक

मुंबई - युवा फलंदाज सर्फराज खानच्या त्रिशतकाच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशविरूद्धचा सामना बरोबरीत सोडवला आहे. मुंबईकडून खेळताना सर्फराजने ३९१ चेंडूत नाबाद ३०१ धावा केल्या. यात त्याने ३० चौकार आणि ८ षटकार मारले. कर्णधार आदित्य तरे शतकापासून तीन तर, सिद्धेश लाड दोन धावांनी वंचित राहिला.

हेही वाचा -

उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ६२५ धावा रचल्यानंतर, मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. या दोघांनंतर भूपेन लालवानीने ४३ आणि हार्दिक जितेंद्रने ५२ धावा जोडल्या. त्यानंतर आलेल्या सिद्धेश लाड आणि सर्फराज खानने मुंबईसाठी किल्ला लढवला. सिद्धेश १० चौकार आणि एका षटकारासह ९८ धावांवर बाद झाला. मुंबई लवकर आटोपणार असे वाटत असताना आदित्य तरे आणि त्याच्यानंतर, शम्स मुलाणी संघासाठी धावून आले. तरेने १४ चौकारांसह ९७ धावा तर, मुलाणीने ५ चोकार आणि एका षटकारासह ६५ धावा केल्या. सर्फराजसोबत आकाश पारकर नाबाद राहिला. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले. या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.