नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने विश्व करंडकातील उपांत्य सामना वगळता, २०१९ मध्ये जबरदस्त कामगिरी केली. पण, आता भारतीय संघासाठी २०२० हे वर्ष आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यावर्षी २०२० चे विश्वकरंडक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरूवातीला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नव्या वर्षाच्या सुरूवातीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीची प्रशंसा केली. ते म्हणाले, 'मी माझ्या जीवनात विराट कोहलीसारखा 'परफेक्ट' कर्णधार पाहिला नाही.'
एखाद्या कर्णधारामध्ये बलस्थान आणि दुबळी बाजू या दोनही असतात. पण विराटच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, तो नेहमी दुबळी बाजूमध्ये सुधारणा करणारा कर्णधार आहे. तो मैदानात स्वत:ला झोकून देतो. हे कौतूकास्पद आहे. मी असा कर्णधार कधीच पाहिलेला नाही. त्याची दिवसागणिक कामगिरी ऊंचावत असल्याचे, शास्त्री म्हणाले.
दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी भारतीय संघ मायदेशात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मालिका खेळणार आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ ५ जानेवारीला श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० मालिकेला सुरूवात करणार आहे.
हेही वाचा - नवे वर्ष, नवा संकल्प...सचिनने शेअर केलेला प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलात का?
हेही वाचा - VIDEO : पीटर सीडलची 'धोनी स्टाईल' कामगिरी, न पाहताच फलंदाजाला केले धावबाद