मुंबई - अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये रंगलेला इंग्लंडविरुद्धचा चौथा आणि अखेरचा कसोटी सामना, भारताने अवघ्या तीन दिवसात एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने चार सामन्याची मालिका ३-१ ने खिशात घातली. तसेच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे.
राहुल गांधी यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात त्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
-
Congratulations to #TeamIndia on a well deserved victory in the 4th #INDvsENG Test & for winning the Test series!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Best wishes for the World Test Championship Finals.
">Congratulations to #TeamIndia on a well deserved victory in the 4th #INDvsENG Test & for winning the Test series!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2021
Best wishes for the World Test Championship Finals.Congratulations to #TeamIndia on a well deserved victory in the 4th #INDvsENG Test & for winning the Test series!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2021
Best wishes for the World Test Championship Finals.
काय म्हणाले राहुल गांधी -
अभिनंदन टीम इंडिया, चौथ्या कसोटीसह मालिका जिंकल्याबद्दल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
भारताने असा जिंकला सामना -
इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ऋषभ पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय फिरकीपुढे गडगडला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गुंडाळला आणि भारताने हा सामना १ डाव २५ धावांनी जिंकला. अक्षर पटेलने ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, तर आर अश्विननेही ४७ धावांत पाच बळी टिपले. पहिल्या डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सामनावीर ठरला. तर अश्विनला मालिकावीरच्या पुरस्कराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार
हेही वाचा - Ind VS Eng ४th Test : टीम इंडियाने WTC फायनलचे तिकीट मिळवले, अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजय