ETV Bharat / sports

WC २०११ : धोनीचा षटकार अन् भारताने जिंकला विश्वकरंडक, सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू - आजच्या दिवशी २०११ मध्ये भारताने जिंकला विश्वकरंडक

महेंद्रसिंह धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराला षटकार ठोकला आणि तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजयानंतर भारताच्या खेळाडूंनी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मानवंदना देताना, त्याला आपल्या खांद्यावर उचलले आणि वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली.

on this day 2 april when indian cricket team wins odi world cup in 2011
WC २०११ : धोनीचा षटकार अन् भारताने जिंकला विश्वकरंडक, सचिन डोळ्यात आनंदाश्रू
author img

By

Published : Apr 2, 2020, 9:54 AM IST

मुंबई - आजच्याच दिवशी २०११ साली प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताने विश्वकरंडकाला गवसणी घातली. महेंद्रसिंह धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराला षटकार ठोकला आणि तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या खेळाडूंनी विजयानंतर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मानवंदना देताना, त्याला आपल्या खांद्यावर उचलले आणि वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली. तेव्हा संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. आज या ऐतिहासिक विश्वविजयाला नऊ वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही तो सामना क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.

on this day 2 april when indian cricket team wins odi world cup in 2011
भारतीय खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून मानवंदना दिली तो क्षण...

आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद शतकी (१०३) खेळीच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २७४ धावांची आव्हानात्मक मजल मारली. तेव्हा सेहवाग आणि सचिन लवकर बाद झाल्याने, भारताची अवस्था २ बाद ३१ अशी झाली. यानंतर विराट कोहली (३५) आणि गौतम गंभीर (९७) यांनी भारताचा डाव सावरला.

कोहली-गंभीर या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्मामध्ये असलेल्या युवराजच्या ठिकाणी धोनी मैदानात आला. हा जुगारच होता. कारण संपूर्ण स्पर्धेत धोनीची कामगिरी युवराजपेक्षा सरस नव्हती. धोनी आणि गंभीरने चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागिदारी केली.

गंभीर बाद झाल्यानंतर युवराज मैदानात आला. धोनी-युवराज जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि धोनीचा चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी येण्याचा जुगार यशस्वी ठरला. धोनीने ७९ चेंडूत आठ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. या विजयानंतर दिग्गज सचिन तेंडुलकरलाही आपले आनंदाश्रू रोखणे अनावर झाले होते.

शोएब अख्तर म्हणतोय, कोरोना लोकांना कंगाल करून सोडणार

कोरोना इफेक्ट : IPL रद्द होण्याआधीच 'या' संघाला बसला २५ कोटीचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.