ETV Bharat / sports

मुंबई टी-20 लीग : पृथ्वी शॉच्या नॉर्थ मुंबई पँथर्सने जिंकला किताब

मुंबई ट्वेंटी-20 लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद सूर्यकुमार यादवच्या ट्रायंफ नाईट बाँम्बे नॉर्थ या संघाने जिंकले होते. तर यंदा हा मान नॉर्थ मुंबई पँथर्सला मिळाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या लीगचा ब्रँड एँम्बॅसिडर आहे.

north mumbai panthers
author img

By

Published : May 27, 2019, 7:03 PM IST

मुंबई - वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई टी-20 लीगच्या अंतिम सामन्यात पृथ्वी शॉच्या संघाने बाजी मारली. रविवारी झालेल्या या सामन्यात नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने सोबो सुपरसॉनिक्स संघाचा १२ धावांनी पराभव केला.

पँथर्सचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वीने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात त्याने ५५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. याव्यतिरीक्त शशिकांत कदमने ३७ तर स्वप्नील साळवीने १८ धावांची खेळी केली. त्यामुळे पँथर्सला ७ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावा करता आल्या.

या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सोबो सुपरसॉनिक्स संघाची फलंदाजीही ढेपाळली. कर्णधार जय बिश्तने २१ धावा बनवल्या. पराग खानपुरकरने ४३ धावांची आतषबाजी खेळी केली पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. सामन्याचे २ चेंडू बाकी असताना सुपरसॉनिक्स संघाचा डाव १३१ धावांवर आटोपला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.