हॅमिल्टन - न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडकडे २१७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. सलामीवीर जीत रावल १३२ आणि टॉम लॅथम १६१ धावा यांच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱया दिवसअखेर ४ बाद ४५१ धावा केल्या आहेत.
Centuries from Tom Latham and Jeet Raval, and fifties from Henry Nicholls and Kane Williamson put New Zealand in a commanding position against Bangladesh on Day 2 of the Hamilton Test. #NZvBAN
— ICC (@ICC) March 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
REPORT ⬇️https://t.co/jPOD5KP9wX pic.twitter.com/5Dwp1tavCm
">Centuries from Tom Latham and Jeet Raval, and fifties from Henry Nicholls and Kane Williamson put New Zealand in a commanding position against Bangladesh on Day 2 of the Hamilton Test. #NZvBAN
— ICC (@ICC) March 1, 2019
REPORT ⬇️https://t.co/jPOD5KP9wX pic.twitter.com/5Dwp1tavCmCenturies from Tom Latham and Jeet Raval, and fifties from Henry Nicholls and Kane Williamson put New Zealand in a commanding position against Bangladesh on Day 2 of the Hamilton Test. #NZvBAN
— ICC (@ICC) March 1, 2019
REPORT ⬇️https://t.co/jPOD5KP9wX pic.twitter.com/5Dwp1tavCm
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २३४ धावा केल्या होत्या. तमिम इक्बालने १२६ धावा करताना बांगलादेशला दोनशे धावापर्यंत मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तमिम व्यतिरिक्त कोणत्याही बांगलादेशच्या फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून नील वॅग्नरने ५ गडी बाद केले. त्याला टिम साउथीने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली.
न्यूझीलंडने पहिल्या डावाची सुरुवात दमदार केली. जीत रावल आणि टॉम लॅथम यांनी २५४ धावांची सलामी दिली. दोघांनीही शतकी खेळी करत बांगलादेशच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. दोघे बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार केन विलियमन्सननेही चांगली फलंदाजी करताना नाबाद ९३ धावा केल्या. त्याला हेन्री निकोल्सने ५३ धावा करत चांगली साथ दिली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. बांगलादेशकडून सौम्या सरकारने २ आणि मेहदी हसन आणि कर्णधार महमूदल्लाहने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर २१७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करुन आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. तर, बांगलादेशचा डावाने पराभव टाळण्याचा प्रयत्न असेल.