मुंबई - इंग्लंड संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. विराट कोहली ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही, असे हुसेन यांनी म्हटलं आहे.
नासिर हुसेन यांनी एका इंग्रजी माध्यमासाठी कॉलम लिहलं आहे. यात त्यांनी विराट कोहलीपेक्षा रुटला चांगला कर्णधार असल्याचे म्हटलं आहे. ते आपल्या कॉलममध्ये लिहतात की, 'जो रूट याने जबरदस्त नेतृत्व केलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यात फसला. एक कर्णधार म्हणून मी विराटचा चाहता नाही. कारण तो कधी गोलंदाजीतील बदल तर कधी फलंदाजीत चूका करतो. तो संपूर्णपणे वर्चस्व गाजवण्यात सक्षम नाही. तरीदेखील रुट आणि विराट या दोघांना माहिती आहे की, सामन्याच्या निकालावरच मूल्याकंन होत असतं.'
दरम्यान, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे. इंग्लंडने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. यात इंग्लंड संघाला मोठी आघाडी मिळाली त्यानंतर इंग्लंडने दुसऱया डावात फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.
विराटने या सामन्यातील पहिल्या डावात ११ तर दुसऱ्या डावात ७२ धावा केल्या. भारतीय संघ ४ सामन्याच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर असून उभय संघातील दुसरा सामना चेन्नईतच खेळला जाणार आहे. या सामन्याला १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल.
हेही वाचा - IND vs ENG: चेन्नईतील पराभव; भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद