ETV Bharat / sports

मुंबईचे वानखेडे स्टेडियम होणार क्वारंटाईन सेंटर

author img

By

Published : May 16, 2020, 10:25 AM IST

एमसीएला लिहिलेल्या पत्रात, पालिकेने वानखेडे स्टेडियमला क्वारंटाईनची सुविधा म्हणून वापरण्यास परवानगी मागितली आहे. बीएमसीने आपल्या पत्राद्वारे एमसीएला सांगितले, की बीएमसीच्या आपत्कालीन कर्मचारी आणि रुग्णांच्या क्वारंटाईनच्या सुविधेसाठी वानखेडे स्टेडियम वापरू इच्छिते. महाराष्ट्रापूर्वी इतर अनेक राज्यांतील स्टेडियममध्ये कोरोना रुग्णांसाठी ही सुविधा केली गेली आहे.

mumbai wankhede stadium to turn into quarantine centre
मुंबईचे वानखेडे स्टेडियम होणार क्वारंटाईन सेंटर

मुंबई - कोरोनाग्रस्तांसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. बीएमसीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला एक पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर वानखेडे स्टेडियममधील हालचालींना वेग आला आहे.

एमसीएला लिहिलेल्या पत्रात, पालिकेने वानखेडे स्टेडियमला क्वारंटाईनची सुविधा म्हणून वापरण्यास परवानगी मागितली आहे. बीएमसीने आपल्या पत्राद्वारे एमसीएला सांगितले, की बीएमसीच्या आपत्कालीन कर्मचारी आणि रूग्णांच्या क्वारंटाईनच्या सुविधेसाठी बीएमसी वानखेडे स्टेडियम वापरू इच्छिते. महाराष्ट्रापूर्वी इतर अनेक राज्यांतील स्टेडियममध्ये कोरोना रुग्णांसाठी ही सुविधा केली गेली आहे.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण कोरोनाची प्रकरणे वाढून 17 हजार 512 झाली आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 655 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 29 हजार 100 झाली आहे. गेल्या 24 तासात 1576 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत राज्यभरात 6564 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 21 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.