ETV Bharat / sports

MI VS SRH : बेअरस्टो-वॉर्नर जोडीशिवाय हैदराबाद करणार मुंबईचा सामना - Wankhede Stadium

आतापर्यंत हैदराबादच्या संघातून बाहेर असणारा न्यूझीलंडचा दिग्गज फलंंदाज मार्टिन गप्टिलला वॉर्नरच्या जागी संघात जागा मिळण्याची शक्यता

हैदराबाद करणार मुंबईचा सामना
author img

By

Published : May 2, 2019, 1:12 PM IST

मुंबई - आयपीएलच्या बाराव्या सत्रात सनरायजर्स हैदराबाद आज वानखेडे मैदानावर यजमान मुंबई इंडियन्ससोबत रात्री ८ वाजता भिडणार आहे. सध्याच्या गुणतालिकेत हैदराबाद १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर मुंबई १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

हा सामना हैदराबादसाठी खूप कठीण जाणार आहे. कारण, त्यांचे सर्वात यशस्वी फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशिवाय सनरायजर्सला मैदानात उतरावे लागणार आहे. दोन्ही खेळाडू विश्वचषकासाठीच्या तयारीसाठी आपल्या मायदेशी परतले आहेत.

बेअरस्टो-वॉर्नर
बेअरस्टो-वॉर्नर

हैदराबादच्या गोलंदाजीची कमान ही आता, कर्णधार केन विलियमसनवर असणार आहे. तर आतापर्यंत संघातून बाहेर असणाऱ्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला वॉर्नरच्या जागी संघात जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईच्या संघाला मागच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३४ धावांनी पराभवाचा सामना कारावा लागला होता. त्यामुळे हा सामना जिंकून मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की करण्याच्या इराद्याने मैदानाकत उतरेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईच्या संघात हार्दिक पांड्या, केरन पोलार्ड सारखे दिग्गज हिटर आहेत. जे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता ठेवतात. मागच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावांची वादळी खेळी साकारली होती.

सनरायजर्स हैदराबाद - केन विल्यम्सन (कर्णधार), बॅसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनीष पांडे, टी. नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, रशीद खान, मोहमद नबी, शाकिब अल हसन, वृद्धिमान साहा, मार्टिन गप्टिल, विजय शंकर, अभिषेक शर्मा, शाहबाझ नदीम.

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अनुकूल रॉय, एव्हिन लेविस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), आदित्य तरे, रसिक सलाम, बिरदर शरण, जयंत यादव, ब्युरन हेंड्रिक्स, लसिथ मलिंगा.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.