ETV Bharat / sports

VIDEO : 'तुम्हारा वाला खेल पाएगा?'...आयपीएलच्या जाहिरातीत धोनीची थट्टा

author img

By

Published : Feb 24, 2020, 4:23 PM IST

विशेष म्हणजे, या जाहिरातीत सर्वच कर्णधारांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आयपीएलच्या या जाहिरातीला चेन्नई सुपर किंग्सनेही ट्विटरवरून आपले उत्तर दिले आहे.

MS Dhoni trolled in IPL 2020 Latest Ad Campaign
VIDEO : 'तुम्हारा वाला खेल पाएगा?'...आयपीएलच्या जाहिरातीत धोनीची थट्टा

मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता आयपीएलनेही या हंगामासाठी आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हेही वाचा - VIDEO : सुपरमॅन स्मिथ!...'हवाई क्षेत्ररक्षण' करत प्रेक्षकांची मिळवली वाहवा

विशेष म्हणजे, या जाहिरातीत सर्वच कर्णधारांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आयपीएलच्या या जाहिरातीला चेन्नई सुपर किंग्सनेही ट्विटरवरून आपले उत्तर दिले आहे.

या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार धोनी २९ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये दाखल होणार आहे. यानंतर तो १ मार्चपासून क्रिकेटच्या सरावाला सुरूवात करणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार धोनी मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात सराव करणार आहे. यावेळी धोनीसोबत सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हेही सराव सत्रात सहभागी होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.