सिडनी - तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. यादरम्यान, भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे.
सिडनीमध्ये खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, जडेजाचा अंगठा दुखावला गेला. तेव्हा त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले. यात त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाला आहे. दरम्यान, जडेजा किमान सहा आठवडे खेळू शकणार नाही. तसेच यासंदर्भात तज्ज्ञांची मतत जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतर त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा नाही हे ठरवले जाईल.
-
Another blow for India!
— ICC (@ICC) January 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ravindra Jadeja, who suffered a blow to his left thumb while batting, has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/jPUlF7HddY
">Another blow for India!
— ICC (@ICC) January 9, 2021
Ravindra Jadeja, who suffered a blow to his left thumb while batting, has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/jPUlF7HddYAnother blow for India!
— ICC (@ICC) January 9, 2021
Ravindra Jadeja, who suffered a blow to his left thumb while batting, has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/jPUlF7HddY
जडेजाला अशी झाली दुखापत -
पहिल्या डावादरम्यान, भारतीय संघ अडचणीत असताना, रविंद्र जडेजाने तळाच्या फलंदाजांना हाती घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, मिशेल स्टार्कचा एक चेंडू त्याच्या हातावर आदळला. यात जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याला त्रास झाला होता. त्यानंतर जडेजाला रुग्णालयात नेण्यात आले होते.
हेही वाचा - Ind vs Aus : पंतपाठोपाठ जडेजालाही दुखापत, भारतीय संघ अडचणीत
हेही वाचा - IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची सिडनी कसोटीवर मजबूत पकड, टीम इंडिया बॅकफूटवर