नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे 'स्पिन ट्विन्स' म्हणून ओळख असलेले कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने कमी वेळात भारतीय संघात आपली जागा पक्की केली. भारताकडून पहिलाच वनडे विश्वचषक खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आफ्रिकेच्या संघाला चांगलाच धक्का दिला होता. सोबत कुलदीपनेही एक बळी घेतला होता. चहलने केलेल्या कामगिरीचे कुलदीप यादवने कौतुक केले आहे.
कुलदीपने पत्रकारांशी बोलताना म्हणाला, “चहल माझ्यापेक्षा अनुभवी गोलंदाज आहे. एखाद्या फलंदाजाची विकेट घ्यायची असेल तर कशी गोलंदाजी करावी याची त्याला माहिती आहे. ”
कुलदीप पुढे म्हणाला, "मी आणि चहलने आफ्रिकेविरुद्ध सामन्यासाठी आखलेली रणनिती १०० टक्के कामी आली. पाहिजे त्यावेळी धावा थांबवणे, विकेट घेणे हे सर्व आम्ही करुन दाखवले आहे."