लंडन - इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जेसन रॉयने गेल्या वर्षी वर्ल्डकपमध्ये आपला स्फोटक फलंदाजीचा नमुना सादर केला. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यापैकी कोणासोबत सलामीला जायला आवडेल, असे विचारले असता त्याने रोहित शर्माचे नाव घेतले.
जेसन रॉय वर्ल्डकप 2019चा नायक म्हणून सिद्ध झाला. त्याने सात डावांमध्ये 443 धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश होता. मात्र दुखापतीमुळे तो तीन सामने खेळू शकला नाही. त्याने भारताविरुद्ध 66, न्यूझीलंड संघाविरूद्ध 60 आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध 85 धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याला केवळ 17 धावा करता आल्या.
रॉय म्हणाला, "जेव्हा मी लहान असताना वर्ल्डकपबद्दल स्वप्न पाहिले होते, तेच घडले. जेव्हा लोक तुमची प्रशंसा करतात तेव्हा ती सर्वात वेगळी भावना असते.''
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याची गणना जगातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये होते. त्याने एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतके ठोकली आहेत. 2019 वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला होता. 2019च्या वर्ल्डकपमध्ये त्याने 648 धावा केल्या आहेत. तर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही सलामीवीर फलंदाजांपैकी उत्तम फलंदाज असल्याचे म्हटले जाते. त्याने 123 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात 5267 धावा केल्या आहेत.