ETV Bharat / sports

IND vs ENG: दोन विकेट घेताच अँडरसनच्या नावे होईल 'या' विक्रमाची नोंद - james anderson total wickets news

अँडरसनने जर अहमदाबाद कसोटीत दोन विकेट घेत ९०० विकेटचा टप्पा पार केला तर तो अशी कामगिरी करणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरेल.

james-anderson-two-wickets-short-for-another-milestone
IND vs ENG: अँडरसनला ९०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी २ विकेटची गरज
author img

By

Published : Feb 23, 2021, 5:06 PM IST

अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन एक खास विक्रमाची नोंद करू शकतो. अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी २ विकेटची आवश्यकता आहे. तो या सामन्यात २ गडी बाद करत हा टप्पा पार करू शकतो.

अँडरसनने जर अहमदाबाद कसोटीत दोन विकेट घेत ९०० विकेटचा टप्पा पार केला तर तो अशी कामगिरी करणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० विकेट घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - १३४७ विकेट
  • शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - १००१ विकेट
  • अनिल कुंबळे (भारत) - ९५६ विकेट
  • ग्लेन मॅग्राथ (ऑस्ट्रेलिया) - ९४९ विकेट
  • वसीम अक्रम (पाकिस्तान) - ९१६ विकेट
  • जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ८९८ विकेट*

भारत-इंग्लंड मालिका बरोबरीत

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली चार सामन्याची कसोटी मालिका सद्यघडीला १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना अहमदाबाद येथे दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरूवात होईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मालिकेच्या निकालावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पात्र ठरला आहे.

हेही वाचा - Vijay Hazare Trophy २०२१ : बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण

हेही वाचा - श्रीलंकेचा फलंदाज उपुल थरंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.