ETV Bharat / sports

जेम्स अँडरसनचे ६०० बळी, पण होता होता राहिला 'हा' विश्वविक्रम - fastest 600 test wickets

अँडरसनने ६०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला असला तरी, एक विश्वविक्रम त्याच्याकडून होता होता राहिला. कसोटीत ६०० बळी मिळवण्यासाठी अँडरसनने ३३ हजार ७१७ चेंडू टाकले. तर मुथय्या मुरलीधरनने ३३ हजार ७११ चेंडूत ६०० बळी घेतले होते. अँडरसनने ६ चेंडू कमी टाकत ही कामगिरी केली असती, तर तो सर्वात जलद ६०० बळी टिपणारा गोलंदाज ठरला असता. या यादीत शेन वॉर्न (३४,९२०) तिसरा तर अनिल कुंबळे (३८,४९४) चौथा आहे.

james anderson misses world record of fastest 600 test wickets by 6 balls
जेम्स अँडरसनचे ६०० बळी, पण होता होता राहिला 'हा' विश्वविक्रम
author img

By

Published : Aug 26, 2020, 11:53 AM IST

Updated : Aug 26, 2020, 12:30 PM IST

साउथम्प्टन - पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. पावसाच्या कृपेमुळे पाकिस्तानचा पराभव टळला. पण, ही कसोटी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी विशेष ठरली. पाकिस्ताचा कर्णधार अझर अलीला तंबूत धाडत त्याने ६०० कसोटी बळींचा विक्रम नोंदवला. कसोटीमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ फिरकीपटू गोलंदाजांनाच ही कामगिरी करता आली आहे.

  • Balls bowled to take 600 Test wickets:

    Muttiah Muralitharan 3️⃣3️⃣,7️⃣1️⃣1️⃣
    JAMES ANDERSON 3️⃣3️⃣,7️⃣1️⃣7️⃣
    Shane Warne 3️⃣4️⃣,9️⃣2️⃣0️⃣
    Anil Kumble 3️⃣8️⃣,4️⃣9️⃣4️⃣ #ENGvPAK pic.twitter.com/HTKxQn5CuJ

    — ICC (@ICC) August 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अँडरसनने ६०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला असला तरी, एक विश्वविक्रम त्याच्याकडून होता होता राहिला. कसोटीत ६०० बळी मिळवण्यासाठी अँडरसनने ३३ हजार ७१७ चेंडू टाकले. तर मुथय्या मुरलीधरनने ३३ हजार ७११ चेंडूत ६०० बळी घेतले होते. अँडरसनने ६ चेंडू कमी टाकत ही कामगिरी केली असती, तर तो सर्वात जलद ६०० बळी टिपणारा गोलंदाज ठरला असता. या यादीत शेन वॉर्न (३४,९२०) तिसरा तर अनिल कुंबळे (३८,४९४) चौथा आहे.

कसोटी क्रिकेटमधील आता सर्वोच्च बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अँडरसन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. १५६ कसोटी सामन्यांमध्ये खेळल्यानंतर तो '६०० विकेट्स क्लब'मध्ये पोहोचला आहे. आपल्या जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीमध्ये त्याने २९ वेळा एका सामन्यात पाच बळी घेतले आहेत, तर तीनवेळा त्याने दहा बळी घेतले आहेत.

Last Updated : Aug 26, 2020, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.