बंगळुरू - भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीतून सावरला आहे. त्याने नेट्समध्ये सराव केला. याचा व्हिडीओ सद्या समोर आला आहे. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच इशांत फिट झाल्यास भारतीय संघासाठी ही नक्कीच जमेची बाजू ठरेल.
इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव केला. यावेळी निवड समितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड देखील उपस्थित होते. इशांतने जवळपास दोन तास गोलंदाजीचा सराव केला.
आयपीएलमध्ये झाली इशांतला दुखापत -
आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना इशांत शर्माला दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. यामुळे तो आयपीएल खेळू शकला नाही. दरम्यान २०२० या वर्षात इशांतची ही दुसरी दुखापत होती. याआधी फेब्रुवारी महिन्यातही इशांतला दुखापत झाली होती.
बीसीसीआयमधील सुत्रांच्या महितीनुसार, इशांत पूर्णपणे फीट असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे इशांत लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा
हेही वाचा - धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या जलद गोलंदाजानं घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
हेही वाचा - टीम इंडियाचे २०२१चे वेळापत्रक आले समोर, खेळाडू राहणार व्यस्त