ETV Bharat / sports

IPL २०२१ : केन विल्यमसनबाबत मोठी अपडेट; खुद्द प्रशिक्षकांनी दिली माहिती - kkr vs srh match

केन विल्यमसन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याला यातून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल, अशी माहिती हैदराबादचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी दिली.

ipl 2021 : kane-williamson-needs-more-time-to-get-match-fit-says-trevor-bayliss
IPL २०२१ : केन विल्यमसनबाबत मोठी अपडेट; खुद्द प्रशिक्षकांनी दिली माहिती
author img

By

Published : Apr 12, 2021, 4:35 PM IST

चेन्नई - सनरायजर्स हैदराबादचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विल्यमसनला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आलेले नव्हते. यामुळे हैदराबाद संघ व्यवस्थापनावर टीका करण्यात येत होती. आता संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी विल्यमसनबद्दल अपडेट दिली आहे.

केकेआरविरुद्धचा सामना संपल्यानंतर बोलताना बेलिस म्हणाले की, 'केन विल्यमसन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याला यातून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. त्याला नेटमध्ये अधिकाधिक सराव करण्याची गरज आहे. जर तो फिट असला असता तर तो जॉनी बेयरस्टोच्या जागेवर संघात खेळला असता. बेयरस्टोने नुकत्याच संपलेल्या भारतविरुद्धच्या सीमित षटकाच्या मालिकेत चांगली कामगिरी नोंदवली होती. जसजशी स्पर्धा पुढे जाईल यात केन विल्यमसन निश्चितपणे खेळेल.'

दरम्यान, सनरायजर्स हैदराबादचा पहिल्या सामन्यात पराभव झाला. कोलकाताने हा सामना १० धावांनी जिंकला. पण या सामन्यात जॉनी बेयरस्टोने अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण पॅट कमिन्सने त्याची खेळी संपुष्टात आणली. बेयरस्टोने ४० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.

हेही वाचा - वेल डन बॉईज! IPL मध्ये केकेआरच्या विजयाचे शतक; शाहरूखने केलं कौतुक

हेही वाचा - IPL २०२१ : असा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकतो, 'या' विक्रमापासून रोहित, विराटसह मातब्बर कोसो दूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.