ETV Bharat / sports

IPL 2020 : पहिल्यांदा घडलं! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश - Woman Support Staff in rcb

आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात एकही विजेतेपद पटकवता न आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने, नवनीता गौतमची नियुक्ती संघाच्या मसाज थेरपिस्ट म्हणून केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा केली आहे. दरम्यान, आपीएलच्या इतिहासात प्रशिक्षण वर्गात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IPL 2020 : पहिल्यांदा घडलं..! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश
author img

By

Published : Oct 18, 2019, 11:21 AM IST

Updated : Oct 18, 2019, 1:08 PM IST

नवी दिल्ली - आयपीएल २०२० हंगामाला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी सर्वच संघानी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. यात नवनवीन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टामध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने सुरू केला आहे. याच पार्श्वभूमिवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या प्रशिक्षण वर्गात एक नवीन महिला सदस्याची भरती केली आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात एकही विजेतेपद पटकवता न आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने, नवनीता गौतमची नियुक्ती संघाच्या मसाज थेरपिस्ट म्हणून केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा केली आहे. दरम्यान, आपीएलच्या इतिहासात प्रशिक्षण वर्गात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • Navnita Gautam joins us as a sports massage therapist for the 13th edition of IPL. She will work to identify, and implement massage therapy to help the team prepare and recover better.
    .
    We are proud to be the first IPL team to have a woman support staff member.
    .#PlayBold pic.twitter.com/Y7CFR0WKDB

    — Royal Challengers (@RCBTweets) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाला मागील १३ हंगामात एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. बंगळुरूने तीनवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागील सत्रात त्याला सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, नवनीता गौतम यांनी याआधी अनेक राष्ट्रीय क्रीडा संघ आणि बास्केटबॉल संघांच्या मसाज थेरपिस्ट म्हणून काम केले आहे. प्रशिक्षक बासू शंकर ( strength and conditioning coach ) आणि मुख्य फिजिओथेरेपिस्ट इव्हान स्पीचली यांच्यासोबत गौतम काम करणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात बंगळुरुचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - विराटने ठेवला अनुष्कासाठी करवा चौथचा उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ

हेही वाचा - भारताविरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा, 'या' अनुभवी खेळाडूकडे नेतृत्व

Intro:Body:

news sports

Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.