ETV Bharat / sports

MI vs KKR : मुंबईचा कोलकातावर सहज विजय; डी-कॉकची शानदार खेळी

आयपीएलच्या सामन्यात मुंबईने कोलकाताला सहज मात दिली आहे. या सामन्यात डी-कॉकची ७८ धावांची खेळी निर्णायक ठरली आहे.

ipl 2020 mi vs kkr match live
MI vs KKR LIVE
author img

By

Published : Oct 16, 2020, 6:45 PM IST

Updated : Oct 16, 2020, 10:56 PM IST

अबुधाबी - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने कोलकाताच्या १४९ धावांचा पल्ला सहज गाठला.

दोन्ही संघांचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. या सामन्यात कोलकाताने मुंबईला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले आहे. पॅट कमिन्सचे झुंजार अर्धशतक आणि कर्णधार इयान मॉर्गनच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे कोलकाताने मुंबईसमोर २० षटकात ५ बाद १४८ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय मॉर्गनच्या अंगउलट आला. मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकाताचे पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेत सलामीवीर राहुल त्रिपाठीला(७) बाद केले. कोलकाताचा दुसरा सलामीवीर शुबमन गिल(२१) आणि कर्णधारपदावरून पायउतार झालेला दिनेश कार्तिक(४) यांना राहुल चहरने बाद केले. स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आज पुन्हा अपयशी ठरला. बुमराहच्या उसळत्या चेंडूवर रसेल १२ धावांवर झेलबाद झाला.

६१ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला असताना मॉर्गन आणि कमिन्सने संघाची धावसंख्या वाढवली. यावेळी मॉर्गनने संयमी आणि कमिन्सने आक्रमक खेळी केली. कुल्टर नाईलच्या शेवटच्या षटकात या जोडीने २१ धावा लुटल्या. मॉर्गन २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांवर तर, कमिन्स ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून बोल्ट, नाईल, बुमराह यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.

LIVE UPDATE :

  • मुंबईता कोलकातावर आठ गडी राखून विजय
  • डी-कॉकने ७८ काढलेल्या धावा निर्णायक ठरल्या आहेत. हार्दिक पांड्या २१ धावावर नाबाद राहिला आहे.
  • मुंबईला विजयासाठी ३० चेंडूत २३ धावांची गरज.
  • पंधरा षटकानंतर मुंबईच्या २ बाद १२६ धावा.
  • मुंबईला विजयासाठी ३९ चेंडूत ३८ धावांची गरज.
  • १३.३ षटकानंतर मुंबईच्या २ बाद १११ धावा.
  • हार्दिक पांड्या मैदानात.
  • सूर्यकुमार बाद.
  • सूर्यकुमार यादव मैदानात.
  • शिवम मावीला मिळाला रोहितचा बळी.
  • मुंबईला पहिला धक्का, रोहित ३५ धावांवर बाद.
  • मुंबईला विजयासाठी ६० चेंडूत ५९ धावांची गरज.
  • दहा षटकानंतर मुंबईच्या बिनबाद ९० धावा.
  • डी-कॉकचे तुफानी अर्धशतक, खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
  • पाच षटकानंतर मुंबईच्या बिनबाद ४८ धावा.
  • पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद ७ धावा.
  • पहिल्याच चेंडूवर रोहितचा चौकार.
  • ख्रिस ग्रीन टाकतोय कोलकातासाठी पहिले षटक.
  • मुंबईचे सलामीवीर मैदानात.
  • २० षटकात कोलकाताच्या ५ बाद १४८ धावा.
  • मॉर्गन ३९ धावांवर नाबाद.
  • कमिन्सचे झुंजार अर्धशतक, खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
  • अठरा षटकानंतर कमिन्स ३६ तर, मॉर्गन २१ धावांवर नाबाद.
  • पंधरा षटकानंतर कोलकाताच्या ५ बाद ९५ धावा.
  • तेरा षटकानंतर कमिन्स १० चेंडूत १८ धावांवर नाबाद.
  • कमिन्सची आक्रमक सुरुवात.
  • पॅट कमिन्स मैदानात.
  • ६१ धावांवर कोलकाताचा अर्धा संघ गारद.
  • बुमराहच्या उसळत्या चेंडूवर रसेल झेलबाद.
  • दहा षटकानंतर कोलकाताच्या ४ बाद ५७ धावा.
  • मॉर्गन-रसेल मैदानात.
  • कार्तिकचा त्रिफळा उध्वस्त, चहरचा दुसरा बळी.
  • शुबमन गिल २१ धावांवर बाद, राहुल चहरला मिळाला बळी.
  • दिनेश कार्तिक मैदानात.
  • नॅथन कुल्टर नाईलने केले राणाला बाद.
  • कोलकाताचा दुसरा फलंदाज बाद, नितीश राणा ५ धावांवर बाद.
  • पाच षटकात कोलकाताच्या १ बाद २८ धावा.
  • नितीश राणा मैदानात.
  • बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिपाठी झेलबाद, सूर्यकुमारने घेतला झेल.
  • कोलकाताला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी बाद.
  • शुबमनकडून डावाचा पहिला चौकार.
  • कोलकाताच्या पहिल्या षटकात बिनबाद ३ धावा.
  • ट्रेंट बोल्ट टाकतोय मुंबईसाठी पहिले षटक.
  • कोलकाताचे सलामीवीर गिल-त्रिपाठी मैदानात.
  • नाणेफेक जिंकून कोलकाताचा फलंदाजीचा निर्णय.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग XI -

इयान मॉर्गन (कर्णधार ), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, शुबमन गिल, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग XI -

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, इशान किशन, नॅथन कुल्टर नाईल.

Last Updated : Oct 16, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.