दुबई - आयपीएल २०२० च्या सलामी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात स्पर्धेचा दुसरा सामना रंगणार आहे. दोन युवा कर्णधार, विजयी श्रीगणेशा करण्यासाठी मैदानात उतरतील. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर केएल राहुलकडे किंग्जची धुरा आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघात ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस गेल आणि मोहम्मद शमी यासाखरे खेळाडू आहेत. तर दुसरीकडे दिल्ली संघात युवा खेळाडूचा भरणा आहे. यात श्रेयश अय्यर, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत ही नावे घेता येतील. रविचंद्रन अश्विनच्या रुपाने यंदा दिल्लीकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. याशिवाय रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा संघ यंदा कशी कामगिरी करणार याकडे सर्वाचे लक्ष्य आहे. मराठमोळा अजिंक्य रहाणेला अंतिम संघात स्थान मिळेल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना दुबईच्या इंटरनॅशलल क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल. सामन्याच्या अर्धातास आधी नाणेफेक होईल.
- दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
- श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, डेनियल सॅम्स, एलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नोर्ट्जे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल आणि अमित मिश्रा.
- किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
- केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, इशान पोरेल, मनदीप सिंह, जिमी नीशम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सूचित, कृष्णप्पा गौतम, हर्दुस विलजोएन आणि सिमरन सिंह.