मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णयक सामना खेळला जात आहे. या सामन्यात विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी सलामी दिली.
रोहितने डीप मिड-विकेटवर सिक्सर लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमारेषेवर उभ्या असलेल्या एव्हिन लुईसने तो झेल एका हाताने पकडला पण आपला तोल जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. लुईसच्या या क्षेत्ररक्षणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
Popular opinion: Kohli is the King of taking blinders.
— Hotstar US (@Hotstarusa) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Evin Lewis: Hold my glass...#FriendsTurnFoes #INDvWI #MenInMaroon pic.twitter.com/Y3Dgb2H0aS
">Popular opinion: Kohli is the King of taking blinders.
— Hotstar US (@Hotstarusa) December 11, 2019
Evin Lewis: Hold my glass...#FriendsTurnFoes #INDvWI #MenInMaroon pic.twitter.com/Y3Dgb2H0aSPopular opinion: Kohli is the King of taking blinders.
— Hotstar US (@Hotstarusa) December 11, 2019
Evin Lewis: Hold my glass...#FriendsTurnFoes #INDvWI #MenInMaroon pic.twitter.com/Y3Dgb2H0aS
दरम्यान, दोन्ही संघासाठी आजचा हा सामना महत्त्वाचा आहे. सध्या ३ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.