इंदूर - भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-२० सामना ७ जानेवारीला इंदूरच्या मैदानात खेळला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय सामन्याची तिकीट दराची घोषणा मध्य प्रदेश क्रिकेट संघटना (एमपीसीए) ने केली आहे. भारत विरुध्द श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्रीडाप्रेमींसाठी सर्वात स्वस्त तिकीट मिळणार आहे. हा सामना अवघ्या ५०० रुपयांत क्रीडाप्रेमींना पाहता येणार आहे.
मध्य प्रदेशातील होळकर स्टेडियमवर होणारा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींसाठी सामान्य गटात वेगवेगळे दर ठेवण्यात आले आहेत. ५०० रुपये ते ४ हजार ९२० रुपये असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. यांची माहिती एमपीसीएच्या अधिकाऱ्याने दिली. या स्टेडियमची क्षमता जवळपास २७ हजार इतकी आहे.
दरम्यान, या सामन्यासाठीची ऑनलाइन तिकीट बुकिंग आज (बुधवार) पासून सकाळी सहा वाजेपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ५ जानेवारीपासून ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना गुवाहाटी, दुसरा इंदूर तर तिसरा सामना पुण्यात खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंकेचा भारत दौरा टी-२० मालिका
- ५ जानेवारी, भारत वि. श्रीलंका. पहिला टी-२० (गुवाहाटी)
- ७ जानेवारी, भारत वि. श्रीलंका दुसरा टी-२० (इंदूर)
- ९ जानेवारी, भारत वि. श्रीलंका, तिसरा टी-२० (पुणे)
भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.
हेही वाचा - पाकिस्तानच्या संघाने विराटकडून शिकावे, पाक खेळाडूचा सल्ला
हेही वाचा - दुखापतग्रस्त वॉर्नर 'Boxing Day Test' खेळणार की नाही, जाणून घ्या