सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिराजने अनुभवी डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात बाद करत चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत दोन चूका केल्या. यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला (५) संघाची धावसंख्या ६ असताना बाद केले. त्याचा झेल पुजाराने टिपला. यानंतर पावसाने हजेरी लावली आणि ४ तासांचा खेळ वाया गेला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन या जोडीने यजमान संघाचा डाव सावरला. दोघांनी नाबाद अर्धशतकी भागिदारी केली. यादरम्यान, पंतने पुकोव्हस्कीला दोन वेळा जीवदान दिले.
-
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
आर. अश्विन पुकोव्हस्कीला चकवण्यात यशस्वी ठरला, परंतु पंतने यष्ट्ट्यांमागे सोपा झेल सोडला. त्यावेळी पुकोव्हस्की २६ धावांवर खेळत होता. पुकोव्हस्कीने जीवदानानंतर खणखणीत चौकार मारून लाबुशेनसोबत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात सिराजच्या गोलंदाजीवर पंतने आणखी एक झेल सोडला. याही वेळेस त्याने पुकोव्हस्कीला जीवदान दिले. पुकोव्हस्कीने यानंतर भारतीय गोलंदाजांचीचा समाचार घेत नाबाद अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने चहापानापर्यंत ३१ षटकात १ बाद ९३ धावा केल्या आहेत.
-
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
हेही वाचा - सिडनी कसोटी : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय
हेही वाचा - EXCLUSIVE: भारतीय संघाने मेलबर्नमधील कित्ता सिडनीमध्ये गिरवावा : प्रवीण आमरे