पुणे - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर रंगला आहे. भारताने ५ बाद ६०१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २७५ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या डावात ४ गडी बाद करत मोलाची भूमिका पार पाडली. दरम्यान, या कामगिरीसह अश्विन आफ्रिकेविरुध्द सर्वात जलद ५० बळी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यासह अश्विनने एका डावात सर्वाधिक वेळा ४ गडी बाद करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अश्विनने ४ गडी बाद केले. त्यानंतर तो एका डावात सर्वाधिक वेळा ४ गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी हरभजनसिंगने आफ्रिकेविरुध्द ७ वेळा एका डावात ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. हरभजनचा हा विक्रम अश्विनने मोडला आहे.
आफ्रिकेविरुध्द एका डावात सर्वाधिक वेळा ४ गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज -
- आर. अश्विन - ८ वेळा
- हरभजन सिंग - ७ वेळा
- अनिल कुंबळे - ६ वेळा
- रवींद्र जडेजा - ६ वेळा
या विक्रमासह अश्विनने आफ्रिकेविरुध्द सर्वात जलद ५० गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. त्याने ९ सामन्यात (आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या डावापर्यंत) ५० गडी बाद केले आहेत. या यादीत भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंग आहेत. आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात अश्विनने २८.४ षटकात ६९ धावा देत २.४१ च्या इकानॉमीने ४ गडी बाद केले.
हेही वाचा - India Vs South Africa, 2nd Test: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट २७५, भारताकडे ३२६ धावांची आघाडी
हेही वाचा - हिटमॅनला भेटण्यासाठी मैदानात घुसला चाहता; झटापटीत जमिनीवर कोसळला रोहित