ETV Bharat / sports

विराट कोहलीला व्हायचंय शिवरायांसमोर नतमस्तक..! रायगड पाहण्याची आहे इच्छा

भारत-दक्षिण आफ्रिका संघामध्ये पुण्यातील गहुंजे मैदानात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने १ डाव १३७ धावांनी आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने संभाजी महाराजांची भेट घेतली. या भेटीदरम्याने त्याने रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

author img

By

Published : Oct 13, 2019, 9:32 PM IST

पुणे - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांची नुकतीच पुण्यात भेट झाली. या भेटीत विराटने संभाजी महाराजांकडे रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. याची माहिती संभाजी महाराजांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका संघामध्ये पुण्यातील गहुंजे मैदानात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने १ डाव १३७ धावांनी आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने संभाजी महाराजांची भेट घेतली. या भेटीदरम्याने त्याने रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

ind vs sa 2019 : indian captain virat kohli meets mp sambhaji maharaj desire to visit raigad
विराट कोहली संभाजी महाराजांसोबत...

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी विराटबरोबर महाराष्ट्रातील क्रिकेटबद्दलही चर्चा केली असल्याचे सांगत त्यांनी या पोस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी ही भेट घडवून आणली असल्याचे सांगितले.

आमच्या भेटीआधी जतीननी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल, यामुळे कदाचित. विराटने स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे संभाजी महाराज यांनी सांगितले.

पुणे येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने नाबाद २५४ धावांची द्विशतकी खेळी केली. विराट सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने दोन सामन्यांनंतर २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे होणार आहे.

हेही वाचा - टीम इंडियाने जिंकली पुणे कसोटी, आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात

हेही वाचा - India Vs South Africa : मोहम्मद शमी नाबाद @३००

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.