ETV Bharat / sports

Ind vs Eng २nd T२० : टीम इंडियाची शानदार गोलंदाजी, इंग्लंडने विजयासाठी दिले १६५ धावांचे लक्ष्य - भारत वि. इंग्लंड दुसरा टी-२० सामना लाईव्ह

इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND VS eng 2nd t20 match
Ind vs Eng २nd T२० : भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान
author img

By

Published : Mar 14, 2021, 8:52 PM IST

Updated : Mar 14, 2021, 9:31 PM IST

अहमदाबाद - इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इंग्लंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या आहेत. दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. शिखर धवन आणि अक्षर पटेल यांना संघातून वगळण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी इशान किशन आणि सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान देण्यात आलेले आहे.

इंग्लंडची सुरूवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच षटकात जोस बटलरला (०) पायचित करत पाहुण्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर जेसन रॉय आणि डेविड मलान या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागिदारी करत डाव सावरला. इंग्लडची धावसंख्या ६४ असताना युझर्वेंद्र चहलने आठव्या षटकात डेव्हिड मलानला (२४) पायचित करत ही जोडी फोडली. यानंतर जेसन रॉयचा अडथळा वॉशिग्टन सुंदरने दूर केला. त्याने रॉयला भुवनेश्वर कुमारकडे झेल देण्यास भाग पाडले. रॉयने ३५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह ४६ धावा केल्या.

रॉय बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन जोडीने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी इंग्लंडला शंभरी पार करून दिली. तेव्हा वॉशिग्टन सुंदरने (२०) बेअरस्टोला सुर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर शार्दुलच्या स्लोवनवर मॉर्गन (२८) चुकला. तो पंतकडे झेल देऊन बसला. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या २० षटकात बेन स्टोक्सचा (२४) झेल हार्दिक पांड्याने घेतला. इंग्लडचा सहावा गडी एकूण धावसंख्या १६० असताना तंबूत परतला. यानंतर सॅम करन (६) व ख्रिस जॉर्डन (०) हे नाबाद राहिले. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर भुवी, चहलने प्रत्येकी १-१ गडी टिपला. दरम्यान, उभय संघात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतलेली आहे.

हेही वाचा - एकदिवसीय क्रिकेटवर मिताली 'राज', अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा

Last Updated : Mar 14, 2021, 9:31 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.