अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. सद्यघडीला ५ सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ विजयासह मालिकेतील आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियात दोन बदल -
भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. शिखर धवनच्या जागी इशान किशनला तर अक्षर पटेलच्या जागेवर सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. दुसऱ्या सामन्यात किशन आणि के. एल. राहुल भारताच्या डावाला सुरूवात करतील. दरम्यान, किशन आणि सुर्यकुमार पदार्पणाचा सामना खेळत आहेत. दुसरीकडे इंग्लंड संघाने एक बदल केला आहे. मार्क वूडच्या जागेवर टॉम कुरणचे पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडचा संघ -
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशिद.
भारतीय संघ -
के. एल. राहुल, इशान किशन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.
हेही वाचा - IND Women vs SA Women : चौथ्या सामन्यासह भारताने मालिका गमावली, पूनमचे शतक व्यर्थ
हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा