चेन्नई - भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. अजिंक्यने गोलंदाज सौरभ कुमार आणि कृष्णप्पा गौतमविरूद्ध नेट्समध्ये घाम गाळला.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे सोमवारी पहिले मैदानी प्रशिक्षण सत्र पार पडले. यात अजिंक्य नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळाला. अजिंक्यने सोशल मीडिया अकाउंटवर फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो बॅकफूट आणि फ्रंटफूट दोन्हीवर शॉट्स खेळताना दिसून येत आहे. 'ट्रेनिंगवर परतलो', कॅप्शन देत अजिंक्यने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
-
Back to training 🏏 pic.twitter.com/kyeWLnKBlX
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Back to training 🏏 pic.twitter.com/kyeWLnKBlX
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021Back to training 🏏 pic.twitter.com/kyeWLnKBlX
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातील कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथे होतील. तर तिसरा आणि चौथा सामना अहमदाबादला होणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी विनाप्रेक्षक खेळवली जाणार आहे. तर दुसर्या कसोटी सामन्यासाठी चेपॉक स्टेडियमवर ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा - WTC : फायनलचे तिकीट पक्के केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन म्हणाला...
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा विजय उल्लेखनीय; विल्यमसनकडून टीम इंडियाचे कौतूक