बंगळुरू - आज जगातील दोन तुल्यबळ संघात लढत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. वानखेडे मैदानावर १० गड्यांनी पराभवाचा स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने राजकोट येथील सामना ३६ जिंकून मालिकेत दमदार पुनरागमन केले. आज अखेरचा निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघ सर्व ताकदीनिशी मैदानात उतरतील.
भारतीय संघाने राजकोटच्या मैदानात चांगला खेळ केला. केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह भारतीय गोलंदाजांनी विजयात मोलाची भूमिका निभावली. महत्वाचे म्हणजे, भारताचे क्षेत्ररक्षण प्रभावी ठरले. मनीष पांडेने डेव्हिड वॉर्नरचा घेतलेला सनसनाटी झेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना ठरला.
फलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास, केएल राहुलने पाचव्या स्थानावर येऊन महत्वपूर्ण खेळी केली. तर रोहित शर्मा- शिखर धवन यांनी डावाची शानदार सुरुवात केली. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर प्रभावी ठरला. यामुळे निर्णायक सामन्यात फलंदाजीचा हाच क्रम कायम राहणार आहे.
गोलंदाजीत बदल होईल, असे वाटत नाही. भारतीय संघ ३ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. युझवेंद्र चहलला निर्णायक सामन्यात संधी मिळेल, असे दिसते. वेगवान माऱ्याची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीकडे राहिल, असे वाटते.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका विजयाच्या दृष्टीने खेळ करेल. डेव्हिड वॉर्नला राजकोटच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. पण तो स्टिव्ह स्मिथने त्याची कसर भरून काढली. डावखुरा एश्टन एगर याच्यापुढे मात्र कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क भेदक मारा करण्यास उत्सुक असतील.
- उभय संघ यातून निवडणार
- भारत -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.
- ऑस्ट्रेलिया -
- अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, सीन एबोट, एश्टन एगर, पीटर हॅन्ड्सकोम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, एशटन टर्नर, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झम्पा.
हेही वाचा - VIDEO : ५ वर्षांपूर्वी डिव्हिलीयर्सने केलेला 'तो' प्रताप तुम्हाला आठवतो का?
हेही वाचा - IND VS AUS : शिखर-रोहितच्या दुखापतीचे अपडेट जाणून घ्या...