मुंबई - भारतीय क्रिकेटपटूंचे जगभरात चाहते आहेत. अनेक चाहते आपल्या आवडत्या खेळाडू अथवा क्रिकेटपटूसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र, भारतीय संघातील एक क्रिकेटपटू असा आहे ज्याच्यासाठी मुली चक्क बीसीसीआयच्या ऑफिसला फोन करतात. एवढेच नव्हे तर, या क्रिकेटपटूच्या फोन नंबरची मागणीही करत असतात.
हेही वाचा - चांदीचा फेडरर!..असा सन्मान मिळवणारा ठरला पहिलाच खेळाडू
भारताचा फलंदाज के.एल.राहुलसाठी बीसीसीआयच्या ऑफिसला अनेक मुली फोन करतात. बीसीसीआयमध्ये रिसेप्शनिश्ट म्हणून काम केलेल्या बर्नार्ड फर्नांडिस यांनी हा खुलासा केला आहे. दररोज शेकडो चाहते कार्यालयात येतात. मात्र, केएल राहुलचा नंबर विचारणाऱ्या मुलींचे सर्वात जास्त फोन येतात, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
बर्नार्ड फर्नांडिस यांनी १५ वर्षे बीसीसीआयमध्ये रिसेप्शनिश्ट म्हणून काम पाहिले आहे. या मागणीव्यतीरिक्त धोनीला निवृत्ती घ्यायला नको, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यांसाठीचा राग या कारणास्तवही चाहते बीसीसीआयच्या ऑफिसला फोन करत असल्याचे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.