ETV Bharat / sports

डॉक्टरांनी सांगितलं, रुग्णालयातून गांगुलींना कधी मिळणार डिस्चार्ज

author img

By

Published : Jan 4, 2021, 7:47 PM IST

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ शकते, अशी माहिती रुग्णालयामधील सूत्रांनी दिली.

ganguly likely to be released from hospital on jan 6
डॉक्टरांनी सांगितलं, रुग्णालयातून गांगुलींना कधी मिळणार डिस्चार्ज

कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ शकते, अशी माहिती रुग्णालयामधील सूत्रांनी दिली. गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गांगुली यांना शनिवार (ता. २) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तात्काळ कोलकातामधील वूडलँड या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. शनिवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

सौरव गांगुली यांच्यावर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. गांगुली यांच्या प्रकृतीविषयी कार्डिअ‍ॅक सर्जन देवी शेट्टी, रमाकांत पांडा, कार्डिओलॉजिस्ट सॅम्युल मॅथ्युज, सामीन शर्मा, कार्डिओलॉजिस्ट अश्विन मेहता यांची मते झूम अ‍ॅप तसेच फोनच्या माध्यमातून जाणून घेण्यात आली.

वैद्यकीय समितीमधील एका डॉक्टरांनी सांगितले की, प्रसिद्ध कार्डिअ‍ॅक सर्जन देवी शेट्टी या मंगळवारी गांगुली यांची तपासणी करतील. यामुळे मंगळवार ऐवजी गांगुली यांना बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात येऊ शकते.

सद्या गांगुली यांच्या छातीत दु:खत नाहीये, त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. यामुळे त्यांना लवकरच घरी सोडण्यात येऊ शकते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील नामंवत मंडळींनी गांगुली यांच्या प्रकृतीविषयी पत्नी डोना यांच्याकडे विचारणा केली आहे.

हेही वाचा - टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

हेही वाचा - श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.