कोलकाता - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर, सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. प्रथम भारत आणि बांगलादेश दरम्यान घरच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला. आता दादाने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - चॅपेल म्हणतात, 'कोहली-रोहितपेक्षा सचिन अन् गांगुलीने केलाय घातक गोलंदाजांचा सामना'
'२०२१ मध्ये पहिल्यांदा चार देशांची मालिका खेळवण्यात येणार असून ही मालिका प्रथम भारतात होईल', असे गांगुलीने म्हटले आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आणखी एक संघ या 'सुपर सीरिज'मध्ये भाग घेईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुणसिंग धुमाळ यांच्यासमवेत गांगुली नुकताच लंडनला गेला होता. येथे त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या भेटीबद्दल गांगुली म्हणाला की, 'ईसीबी बरोबर आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि बैठक खूप चांगली झाली.'
आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही क्रिकेट मंडळामध्ये तीनपेक्षा जास्त देश मालिकांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. मात्र, या मालिकेत एकूण चार देश सहभागी होत आहेत, जे आयसीसीच्या नियमांच्या विरुद्ध असतील. आत्तापर्यंत, आयसीसीने अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही.