ETV Bharat / sports

निवडणूक आयोगाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर राहुल द्रविड 'या' कारणामुळे करणार नाही मतदान - Election

द्रविड बंगळुरूत १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही

राहुल द्रविड
author img

By

Published : Apr 15, 2019, 12:50 PM IST

Updated : Apr 15, 2019, 1:03 PM IST

बंगळुरू - भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि 'द वॉल' म्हणून प्रसिध्द असलेला राहुल द्रविड बंगळुरूत १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही. द्रविडचे नाव मतदार यादीत नसल्याने तो यावेळी मतदानापासून वंचित राहणार आहे. द्रविड हा कर्नाटक निवडणूक आयोगाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असून तोच मतदानापासून वंचित राहणार असल्याने संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.

राहुल द्रविडने २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान आपले घर बदलले होते. त्यावेळी राहुलने जुन्या मतदारसंघातून आपले नाव वगळले होते. मात्र जेव्हा तो नव्या घरी राहायला गेला तेव्हा त्याने आपल्या नव्या पत्त्यावरुन मतदानाचा अर्ज भरला नाही. त्यामुळे राहुलचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तो मतदान करु शकणार नाही.

मतदारसंघातून आपले नाव वगळ्यासाठी मतदाराला अर्ज क्रमांक ७ भरावा लागतो. तर पुन्हा मतदानासाठी अर्ज क्रमांक ६ भरणे गरजेचे असते. मात्र द्रविडने अर्ज क्रमांक ६ भरला नसल्याने त्याचे नाव मतदारयादीतून काढण्यात आले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 15, 2019, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.