ETV Bharat / sports

चेन्नई संघात अनेकजण रणनीतिकार - डु प्लेसिस - faf du plessis and csk news

डु प्लेसिसने झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज पॉमी मांग्वाशी इन्स्टाग्रामवर बोलताना सांगितले, "संघातला कोणीतरी खेळाडू आपल्याला सामना जिंकून देईल, असा आत्मविश्वास चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये आढळतो. आणि एखादा खेळाडू असे करतोच. सर्व खेळाडूंवर दबाव असतो. वारंवार कृतीतून आत्मविश्वास वाढतो. "

faf du plessis speaks about strategists in chennai super kings
चेन्नई संघात अनेकजण रणनीतिकार - डु प्लेसिस
author img

By

Published : Jun 27, 2020, 5:21 PM IST

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसने आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जमधील (सीएसके) वातावरणावर भाष्य केले आहे. सीएसकेमध्ये वातावरण फार शांत असते, असे डु प्लेसिस म्हणाला.

डु प्लेसिसने झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज पॉमी मांग्वाशी इन्स्टाग्रामवर बोलताना सांगितले, "संघातला कोणीतरी खेळाडू आपल्याला सामना जिंकून देईल, असा आत्मविश्वास चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये आढळतो. आणि एखादा खेळाडू असे करतोच. सर्व खेळाडूंवर दबाव असतो. वारंवार कृतीतून आत्मविश्वास वाढतो. "

डु प्लेसिस पुढे म्हणाला, "चेन्नई मधील माझा अनुभव असा आहे, की इथले ड्रेसिंग रूम खूप शांत आहे. ड्रेसिंग रूममध्ये खूप जण रणनीतिकार आहेत."

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नईची गणना केली जाते. या संघाने 2010, 2011 आणि 2018 मध्ये तीन वेळा विजेतेपद जिंकले आहे. तर लीगमध्ये प्रत्येक वेळी सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यंदाचे आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होते. मात्र कोरोनाव्हायरसमुळे ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.