नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू फॉफ डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आफ्रिकेचा महत्त्वाचा क्रिकेटपटू म्हणून डू प्लेसिसची ओळख आहे.

अलीकडे डु प्लेसिस पाकिस्तान दौर्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसला होता. या दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याला केवळ ५५ धावा करता आल्या. शिवाय, आफ्रिकेला मालिकाही गमवावी लागली. ३६ वर्षीय डू प्लेसिसने देशासाठी ६९ कसोटी सामने खेळले आहेत.
या कसोटी सामन्यांंमध्ये त्याने ४०.०३च्या सरासरीने ४१६३ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याने ११८ डावात १० शतके आणि २१ अर्धशतकेही झळकावली आहे.
हेही वाचा - डावखुरा वेगवान गोलंदाज ते इंग्लंडची भंबेरी उडवणारा फिरकीपटू!